सिडकाेने विकासकामे करावे; अन्यथा जनआंदाेलनाचा नागेश कुठारे यांचा इशारा

विकासकामे थांबल्यामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास

0

औरंगाबाद  : सिडको वाळूज महानगर सिडको प्रशासनाने ३ मार्चपासून सिडको वाळूज महानगरमधील १, २ व ४ रस्ते, ड्रेनेजलाईन, पाणी, मलनिस्तारण प्रकल्प, ले-आउट मंजुरीचे प्रकरण,क्रीडांगण पुलांची उभारणे, स्मशानभूमी इत्यादी विकासकामे थांबलेले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास होत आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत ही कामे सुरू ठेवण्यात यावे; अन्यथा सिडकाे प्रशासनाच्या विराेधात सिडकाे वाळूज महानगर बचाव कृती समिती मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी सांगितले.

सिडको वाळूज महानगर सिडको प्रशासनाने ३ मार्चपासून सिडको वाळूज महानगरमधील १, २ व ४ रस्ते, ड्रेनेजलाईन, पाणी, मलनिस्तारण प्रकल्प, ले-आउट मंजुरीचे प्रकरण,क्रीडांगण पुलांची उभारणे, स्मशानभूमी इत्यादी विकासकामे थांबलेले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक तसेच माणसिक त्रास होत आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत ही कामे सुरू ठेवण्यात यावे; अन्यथा सिडकाे प्रशासनाच्या विराेधात सिडकाे वाळूज महानगर बचाव कृती समिती मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे ता. 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीतून अध्यक्ष नागेश कुठारे यांनी सांगितले. सिडको वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव सिडको प्रशासनाने ता.. ३ मार्च २० रोजी महाराष्ट्र शासनाकडे पाठविला होता. यावर अद्यापही शासनाने निर्णय घेतलेला नाही. पालकमंत्री, नगरविकास मंत्री सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्यप्रशासक यांना वेळाेवेळी सिडकाे वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात येऊन थांबलेली कामे शासनाचा निर्णय येईपर्यंत केली जावी, असे म्हटले आहे. सिडकोची स्थापना करताना मूलभूत सेवा-सुविधा विकास करण्याचे आश्वासन सिडको ने दिले होते ते पूर्ण न करता सिडको वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्यात येऊ नये. अशी मागणी शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने शासनाने या संदर्भात सिडको प्रशासनाला पत्र पाठवूनही यावर निर्णय घेत नाही. शासनाकडे माहिती देत नाही. सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीने ता. १६.ऑक्टो.२० रोजी स्मरण पत्र देऊन आंदोलन का करू नये म्हणून पत्र दिले.यानंतर वसाहत आधिकारी यांनी बैठक घेऊन निवेदनात मांडलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठीचे आश्वासन दिले .मात्र अद्याप यावर कुठलाही निर्णय प्रशासनाने व शासनाने न घेतल्यामुळे पुन्हा घेतलेल्या बैठकीत सिडकाे वाळूज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे पदाधिकारी तसेच सिडको वाळूज महानगर मधील सोसायटीचे अध्यक्ष सचिव तसेच सिडको वाळूज महानगर १,२ व ४ मधील सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये दि.२१ डिसेंबर २०२० रोजी सिडको प्रशासनाच्या विरोधात मोठे व्यापक जनआंदोलनात धरणे आंदोलन, रस्ता रोको करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचे नागेश कुठारे यांनी सांगितले. या बैठकीस सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, नरेंद्र यादव,शितल गंगवाल, चंद्रकांत चोरडिया, संतोष गाढे ,माणिक कुलकर्णी,सुशांत चौधरी, सुशीलकुमार सावंत,अनिल माळवदे ,प्रशांत वडांगळे,प्रकाश जाधव, कुवर दयालसिंग ,प्रमोद नाईक, शिंपी प्रशांत, चिंतामण शेट्टे, आप्पासाहेब गायके, विजय कसबे , इंगोले गोविंद ,रोहिदास लोहार, संजय महाजन, प्रज्योत मादळे, फकीरचंद दाभाडे, ज्ञानेश्वर उबाळे, डॉ, विशाल जैन, निलेश भारती, कमलकिशोर काबरा इत्यादी नागरिकांची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.