मुंबई झोनमधून चिराग फलोरची देशात चमकदार कामगिरी

पंतप्रधानांचा पुणेकर 'मित्र' चिराग फलोर जेईई अॅडव्हान्स परीक्षेत देशात अव्वल

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालशक्ति पुरस्काराने गौरवलेला पुण्याचा चिराग फलोर  जेईई अॅडव्हान्स परीक्षेत  अव्वल आला. या परीक्षेत 43 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुंबई झोनमधून चिराग फलोरने देशात चमकदार कामगिरी केली.

चिराग फलोर  जेईई अॅडव्हान्स परीक्षेत  अव्वल आला. या परीक्षेत 43 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुंबई झोनमधून चिराग फलोरने देशात चमकदार कामगिरी केली.‘बाल पुरस्कार प्राप्त असलेला माझा मित्र चिराग फलोरला भेटा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गणित व विज्ञान स्पर्धांचा तो विजेता आहे. खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. चिरागचे भविष्य उज्ज्वल आहे आणि मी त्याला यशासाठी शुभेच्छा देतो.’ असे ट्वीट चिरागच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जानेवारीला केले होते. चिराग फलोर याचा जन्म 26 ऑगस्ट 2002 रोजी झाला. त्याला विज्ञान आणि खगोलशास्त्राची आवड आहे. अमेरिकन गणित स्पर्धेत (एएमसी-10) 2019 मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त करुन त्याने देशाची मान अभिमानाने उंचावली होती. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतही त्याने प्रशंसनीय कामगिरी केली होती. हंगेरीतील केजेथेली येथे 2019 मध्ये आयोजित अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रोफिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत त्याने भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात त्याला बालशक्ति पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले होते. IIT मुंबई झोनमधून चिराग फलोर याने सामान्य श्रेणीत पहिला क्रमांक पटकावला. त्याला 396 पैकी 352 गुण मिळाले आहेत. तर कनिष्का मित्तल या विद्यार्थिनीने सामान्य श्रेणीत 17 वा आणि महिलांच्या यादीत पहिला येण्याचा मान मिळवला. तिला 396 पैकी 315 गुण मिळाले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.