मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा, एक बेडूक आणि त्याची दोन पोरे

बेडूक आणि त्याची पिल्ले वाघ पाहून सुटले ओरडत...

0

मुबई :‘ गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करतात. काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचे नाही, तर  कााहींना गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणेंवर निशाणा साधला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी केली.

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करतात. यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणेंवर निशाणा साधला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी केली. ठाकरे म्हणाले की, ‘काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचे नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर असे बेडूक आहेत. तुम्हा सर्वांना तर माहिती आहे एक बेडूक आणि त्याची दोन पोरे. या पक्षातून त्या पक्षात. बेडकाच्या पिल्लाने बैल पाहिला, असे मी लहान असताना गोष्ट ऐकली होती. पण आता बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला आणि ते पळत सुटले. त्यांनी बाबांना सांगितले. बाप आवाज काढतो पण, आवाज असा काही..’ अशी टीका ठाकरे यांनी केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यंदा कोरोनाच्या सावटामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळीचा सोहळा स्वातंत्र्यावीर सावरकर सभागृहात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.