मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आवाहन; पण मित्र पक्ष काँग्रेसनेच फिरवली पाठ!
काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते या बैठकीला राहणार उपस्थित
मुंबई : राज्यातील कोरोना संकट वाढत असताना राजकीय कार्यक्रम रद्द, राजकीय पक्षाच्या बैठकी रद्द केल्या असल्या तरी काँग्रेस पक्षाने नियोजित बैठक रद्द न करता मुंबईत आयोजन केले आहे. सरकारमधील मित्र पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत नाहीत हे उघड होत आहे.
काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची टोलेजंग बैठक मुंबईत आयोजन आज केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता महिला विकास महामंडळ सभागृह, नरिमन पाईंट येथे होणार आहे. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले होते. ‘सध्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सामाजिक, राजकीय, धार्मिकसह सर्व कार्यक्रम रद्द करावे, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मार्चपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले होते. विशेष म्हणजे, विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष यांनी देखील त्यांच्या राजकीय बैठका आणि आंदोलन रद्द केले. मात्र, शिवसेनेचा महाविकास आघाडीत मात्र मित्रपक्ष काँग्रेसच्या पक्षाने पार्लमेंटरी बोर्डची बैठकीचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे देशातील आणि राज्यातील सर्वव प्रमुख नेते या बैठकीला उपस्थितीत राहणार आहे. राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारच्या वतीने लोकांना कमी गर्दी करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री करत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच मित्र पक्षमधील नेते मुख्यमंत्री यांचा ऐकत नाही, अशीच सद्यस्थिती दिसून येत आहेत.