मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा

एनडीएच्या बैठकीत दिवाळीनंतर आपला नवा नेता निवडण्याचा निर्णय

0

पाटणा :बिहार विधानसभा निवडणुकीनंतर  मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला

आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत दिवाळीनंतर आपला नवा नेता निवडण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. आता यानंतर पुढची बैठक दिवाळीनंतर अर्थात १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. मंगळवारी जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या निकालात २४३ सदस्यांच्या विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाने  ७५ जागांवर विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपने ७४ जागा आपल्या ताब्यात घेतल्या. तर जेडीयूला ४३, काँग्रेसला १९, एलजेपी १ आणि इतरांना ३१ जागा मिळाल्या. भाजप आणि नितीश कुमार यांच्या एनडीएकडे १२५ जागा आहेत. एनडीएमध्ये सहभागी असलेल्या व्हीआयपी आणि हम यांना चार – चार जागा मिळाल्या आहेत. सातव्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या शक्यतांवर नुकतेच नितीश कुमार यांनी ‘हा निर्णय एनडीएचे आमदार करतील. मी हा कधीही दावा केलेला नाही की राज्याचा पुढचा मुख्यमंत्री मीच असेन’, असेही त्यांनी म्हटले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.