छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सिडकोतील ज्ञान संदीप शिक्षण संस्थेत उत्साहात साजरी

अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष काश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव संगीता खिल्लारे

0

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त सिडको एन.7 येथील ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूलमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सिडको एन.7 येथील ज्ञान संदिप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रकाश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव संगीता खिल्लारे, तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे याची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात बोलतांना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विविध कार्यक्रमांनी शिवजयंतीमोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव चौधरी यांनी केले तर सुनील चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहेबराव शिन्दे, विजय पाटील, कमल खरात सह आदींचे सहकार्य लाभले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.