‘नवरी नटली’ या लोकगीताचे वेड लावणारे गायक छगन चौगुले यांचे निधन

कोरोनामुळे मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल

0

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला आपल्या आवाजाने वेड लावणाऱ्या गायक छगन चौगुले यांचे निधन झाले. कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

छगन चौगुले यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती, त्यानंतर त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कोरोनाशी झुंज देण्यात ते अपयशी ठरले. छगन चौगुले आपल्या खास लोकगीतांसाठी प्रसिद्ध होते. नवरी नटली हे त्यांचे लोकगीत खास लोकप्रिय होते. महाराष्ट्राच्या घराघरांंत आजही हे गीत आपल्याला वाजत असल्याचे पहायला मिळतं. नवरी नटली सोबतच ‘मांढरदेवी काळुबाईची कथा’ हा त्यांना अल्बम चांगलाच प्रसिद्ध होता. याशिवाय गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’, ‘दोन बायकांची चाल पाडली देवानं’ ही त्यांच्या काही प्रसिद्ध अल्बमची नावे आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.