कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तसृंशी गडावर तृतीयपंथीयांकडून ‘छबिना उत्सव’

कोरोनाचे नियम पाळून 'छबिना उत्सव', मंदिरे खुली करण्याची तृतीयपंथीयांची मागणी

0

नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनाची परिस्थितीमुळे या उत्सवासाठी तृतीयपंथी समाजाचे मोजकेच प्रतिनिधी उपस्थित होते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हा उत्सव सप्तसृंशी गडावर दरवर्षी आयोजित केला जातो.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हा उत्सव सप्तसृंशी गडावर दरवर्षी आयोजित केला जातो. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनाची परिस्थितीमुळे या उत्सवासाठी तृतीयपंथी समाजाचे मोजकेच प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी राज्यातील मंदिरे लवकरात लवकर खुली करावीत, अशी मागणी तृतीयपंथाच्या प्रतिनिधींनी केली. कोरोनाच्या पर्श्वभूमीवर या वर्षीची कावडयात्रा रद्द करण्यात आली. पण तृतीयपंथीयांच्या छबिना उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून  छबिना उत्सवाला स्थानिक प्रशासानाकडून परवानगी देण्यात आली. कोजागिरी निमित्त दरवर्षी तृतीयपंथीयांची सप्तश्रंगी गडावर जत्रा असते. मध्यरात्रीच गड गजबजून जातो. यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गडावर नवरात्रोत्सव झाला नाही. तसेच कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवदेखील होऊ शकला नाही. मात्र, तृतीयपंथीयांच्या यात्रेची म्हणजेच छबिन्याची परंपरा खंडित होऊ नये यासाठी मोजक्या पंधरा जणांना गडावर जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार भास्कर गुरू आणि पायल गुरु यांच्या नेतृत्वाखाली गडावर असलेल्या शिवालय तलावापासून देवी मंदिराच्या पायथ्यापर्यंत देवीच्या मूर्तीला नेण्यात आले. मंदिराच्या पायथ्याजवळ देवीची पूजा करण्यात आली. यावेळी कोरोनाचे संकट टळावे, यासाठीही तृतीयपंथीयांकडून देवीला साकडे घालण्यात आले. तृतीयपंथीय गटाचे गुरु आखिल भारतीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगिरीजी यांच्या नेतृत्वात यावेळी मोजकेच सदस्य उपस्थित होते. यावेळी मंदिरे लवकरात लवकर खुली करावीत अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली. तसेच परंपरा खंडित होऊ नये म्हणून परवानगी दिल्याबद्दल तृतीयपंथीयांनी प्रशासनाचे आभार मानले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.