वैजापूर तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ साखळी उपोषण

रस्त्याच्या दुरावस्थासंदर्भात आज पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी मोहन आहेर यांना दिले निवेदन

0
वैजापूर : शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाची माहिती दर्शविणारे फलक लावण्यात यावे तसेच इस्टीमेट प्रमाणे रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.शहर व ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यासंदर्भात आज पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी मोहन आहेर  यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
वैजापूर शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाची माहिती दर्शविणारे फलक लावण्यात यावे तसेच इस्टीमेट प्रमाणे रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहर व ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यासंदर्भात आज पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी मोहन आहेर  यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.ग्रामीण भागातील रस्त्यांविषयी गेल्या १८ दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या वैजापूर तालुका कृती समितीच्या उपोषणाला ही पत्रकारांनी भेट देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जफर ए.खान, दामोदर पारीख, प्रशांत त्रिभुवन, बाबासाहेब धुमाळ, डॉ. साबणे,दिगंबर गायकवाड,दीपक बरकासे,विलास म्हस्के,मन्सूर अली ,राहुल त्रिभुवन,विशाल त्रिभुवन, जीवन पठारे,शांताराम मगर,किरण राजपूत आदींची उपस्थिती होती.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.