केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाकडून गंगापूर तालुक्यातील शेती आणि गावांची पाहणी

0

औरंगाबाद : केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाने पहिल्या टप्प्यात सर्वप्रथम मराठवाड्यातून सुरुवात केली आहे. बुधवारी दुपारी प्रत्यक्षात औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मुरमी-टेंभापुरी शिवारात शेतातील कपाशी, मका, गहू, हरभरा आदी पिकांसह गावागावांत जाऊन दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी पथकाने टेंभापुरी धरणास भेट देऊन येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी या पथकासमोर आपल्या व्यथा मांडल्या. हे पथक मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागांची पाहणी करणार आहे.

यावेळी जिल्हा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, तहसिलदार अरुण जर्हाड, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड देवयानी डोणगांवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ, दहेगाव (बंगला) चे सरपंच विक्रम राऊत यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हे पथक 5 ते 7 डिसेंबर दरम्यान दौ-यावर असणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती केली आहे. हे दोन्ही पथक पाहणी करून 7 डिसेंबर रोजी मुंबईत होणा-या बैठकित राज्यातील खरीप हंगामाच्या पाहणीचा अहवाल देणार आहेत. त्या अहवालानंतर केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांसाठी मदतीबाबत निर्णय घेणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.