‘ठाकरे’चा ट्रेलर आज होणार प्रदर्शित, चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉरचा आक्षेप

0

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट वादात अडकला आहे. या चित्रपटाची सर्व महाराष्ट्राला उत्सूकता लागली आहे. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. त्यानंतर चित्रपटच प्रदर्शित होण्याची सर्वांना उत्सुकता आहे. आज दुपारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. मात्र चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.

खासदार संजय राऊत निर्मित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास लाँच केला जाणार आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याने ट्रेलर आज लाँच होईल की नाही या प्रश्नचिन्ह होते. मात्र चित्रपटाचा ट्रेलर वेळेतच लाँच होणार असल्याची भूमीका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. चित्रपटाचा ट्रेलर वडाळ्यातील कार्निव्हल आयमॅक्समध्ये रिलीज होणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाके, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते उपस्थित राहणार आहेत.

चित्रपटात वादग्रस्त बाबरी मशिद प्रकरणी काही दृश्य आहेत. भविष्यात या दृश्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो. हा वाद निर्माण होऊ नये, यासाठी सेन्सॉरने या दृश्यांवर आक्षेप घेतला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.