गारखेडा परिसरातील छत्रपती विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील छत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
गारखेडा परिसरातील छत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण तर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निर्मला व्यवहारे, रामदास वाघमारे,आण्णा आंधळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जात-पात न मानणारे राजे होते. सर्व जाती धर्माकरिता काम करणारा खरा राष्ट्रभक्त रयतेचा प्रतिपालक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिले जात असे चव्हाण यांनी सांगितले. कार्यक्रमात सहशिक्षक रामदास वाघमारे, जितेंद्र शिंदे, राजेश आंधळे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. यावेळी शाळेतील विद्यार्थीनी मुस्कान मतीन सय्यद हिला शालेय गणवेश भेट देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आंधळे यांनी केले तर अनिता कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्तम जाधव, राजेश आंधळे, रामदास वाघमारे, अण्णा आंधळे, जितेंद्र शिंदे, विजू मारग,नंदा देशमुख, अनिता कांबळे, लक्ष्मण पाटील, अपूर्व पाटील परिश्रम घेतले.