छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

भारतीय संविधान आणि घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ 'संविधान दिन'

0

औरंगाबाद  : संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.  कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय आणि दंत महाविद्यालय आणि रुग्णालय येथे आयुष मंत्रालय, नवी दिल्ली, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद, नवी दिल्ली, संचालक (आयुष) आयुष संचालनालय, मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार संविधान दिन कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक विलगीकरणाचे पालन करून ‘संविधान दिन’उत्साहात साजरा करण्यात आला.

     कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय आणि दंत महाविद्यालय आणि रुग्णालय येथे आयुष मंत्रालय, नवी दिल्ली, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद, नवी दिल्ली, संचालक (आयुष) आयुष संचालनालय, मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार संविधान दिन कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक विलगीकरणाचे पालन करून  ‘संविधान दिन’उत्साहात साजरा केला. संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.  भारतीय संविधान आणि घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची आदरांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान प्रतिज्ञांचे वाचन करून त्यानंतर राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय संचालक डॉ. सुभाष भोयर, डॉ. जयश्री देशमुख, मानवसंसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय वाळुंज पाटील आणि प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.