शहीद भगतसिंह विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
औरंगाबाद : वाळूज महानगर -बजाजनगर येथील शहीद भगतसिंह विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
वाळूज महानगर -बजाजनगर येथील शहीद भगतसिंह विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली.यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गौतम शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितिन देशमुख, चक्रधर डाके यांची महत्वाची उपस्थित होती. यावेळी बोलतांना मुख्याध्यापक गौतम शिंदे यांनी सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे कार्य आपल्याला समजून घेत असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही कर्मकांड केल्याचे ऐकिवात नाही, त्यांनी कधीही कोणताही मुहूर्त पाहिला नाही. मुहूर्त बघून कोणतीही लढाई केली नाही. पौर्णिमेला शुभ मानले जाते,अमावस्या अशुभ मानली जाते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुसंख्य लढाया अमावस्येच्या दिवशी झाल्याचे आढळते. तसे त्यांना अमावस्या असल्यामुळे कोणतेही अपयश कधीही आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या आणि त्या माध्यमातून त्यांचे विचार डोक्यात घेण्याचे मात्र आपण सर्रास विसरतो आदी शिंदे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मघाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभारही मघाडे यांनी मानले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते.