न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भारती साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब हरकळ

0

औरंगाबाद :  वाळूज महानगर – रांजणगाव शे.पुं. येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याच आले होते.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शिवआरती केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भारती साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब हरकळ, इस्माईल शेख, वाहेद पठाण, श्याम टापरे यांची उपस्थिती होती.

रांजणगाव शे.पुं. येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात   आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शिवआरती करण्यात आली. यावेळी कोविड-19 निर्देशाचे  पालन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका भारती साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब हरकळ, इस्माईल शेख, वाहेद पठाण, श्याम टापरे यांची उपस्थिती होती. यावेळी माजी सैनिक नानासाहेब हरकळ यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त भाषणापूरते मर्यादित न ठेवता त्यांना आचार, विचार आणि उच्चाराच्या माध्यमातून  आचरणात आणण्याचा सल्ला दिला.  विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व पोवाडे गाऊन शिवकार्याचे कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू खोपडे यांनी तर उपस्थितांचे आदिनाथ अडसरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी- पालक यांनी परिश्रम घेतले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.