औरंगाबादच्या सिडकाे एन -7 येथील विद्यालयांत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा
संस्थापक , अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन
औरंगाबाद : सिडकाे एन -7 येथील ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचालित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सिडकाे एन -7 येथील ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचालित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधान दिन ता. 26 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि संविधानाच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक ,अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांच्यासह उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. संविधानाचे वाचन कु.प्रिया मोरे या विद्यार्थ्यांनीने केले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक ,अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांच्यासह सचिव संगीता खिल्लारे, तुकाराम सोनवणे स्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे ,ज्ञानसंदिप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजीत सोनवणे वरिष्ठ शिक्षक सुनील चौधरी , संजीव चौधरी, नजमा खान, विजय पाटील, साहेबराव शिंदे, किरणकुमार सोनवणे, अजयकुमार खिल्लारे, विजय आघाव, स्वामी जाधव, नईम शेख आदींची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव चौधरी यांनी केले तर मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांनी आभार मानले.