ऑनलाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भलतेच कॉल, पैसे न दिल्यास ‘ते’ व्हिडीओ व्हायरलची धमकी

विद्यार्थ्यांना धमकी : माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाक नाहीतर तुझे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर ...

0

नाशिक : तुमची मुलेही जर ऑनलाईन अभ्यास करत असतील तर सावधान राहा. कारण, ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एका वेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाक नाहीतर तुझे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशी धमकी देणारे फोन सध्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना येत आहेत.

नाशिकमध्ये या फोन कॉल्समुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये  भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिकमध्ये अशाच एका त्रस्त पालकांनी अखेर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. ‘आमच्या अकाउंटवर तात्काळ पैसे टाक नाहीतर तुझा खासगी व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो, असे धमकीचे फोन सध्या नाशिकच्या काही विद्यार्थ्याना वारंवार येत आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणे हे कॉल्स आता विद्यार्थ्यांच्या पालकांनादेखील येत असून त्यांनाही धमकी देण्यात येत आहे. ‘तुमच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल करतो,’अशा धमक्या पालकांना दिल्या जात आहेत. अशीच घटना सामाजिक क्षेत्रात निडरपणे काम करणाऱ्या राजू देसले यांच्या मुलासोबत घडली. राजू यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या, फोन कॉल्समुळे ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थी कमालीचे विचलित झाले असून अनेकांनी या फोन कॉलच्या भीतीपोटी अभ्यास करणेच बंद केले आहे. राज्यभरात सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अशातच फोनवर लोकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीने आता आपला मोर्चा थेट विद्यार्थ्यांकडे वळवल्याने पालक आणि विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.