मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक : सुरेशदादा पाटील

मराठा नेते आक्रमक; त्यानंतर आम्ही थोबाड फोडो आंदोलन करू,” असा विजयसिंह महाडिक यांचा इशारा

0

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी येत्या 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा नेत्यांनी केली आहे. आज (23 सप्टेंबर) झालेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. आमच्या मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेण्यात येईल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कोल्हापुरात आज गोलमेज परिषद पार पडली. यावेळी 15 ठराव मंजूर करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोलमेज परिषदेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी बंदची हाक दिली. “आमच्या ठरावाची प्रत राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही पाठविण्यात येणार आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही बंद मागे घेऊ,” अन्यथा 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. आमचा बंद शांततेत राहील. पण आमचा अंत पाहू नका. आम्ही सरकारला आमचे 15 ठराव पाठवत आहोत. त्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने आम्हाला बोलावू नये. तर त्यावर निर्णय घ्यावा. आमच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका,” अशी कळकळीची विनंतीही त्यांनी सरकारला केली. ”आम्ही बंदची हाक दिली आहे. त्याआधीच सरकारने या ठरावांची अमलबजावणी करावी. नाही तर 10 तारखेनंतर आम्ही थोबाड फोडो आंदोलन करू,” असा इशारा विजयसिंह महाडिक यांनी दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.