आज 10 राज्यांत 54 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

0

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. त्याचबरोबर 10 राज्यातील एकूण 54 मतदारसंघांची पोटनिवडणुकही आज होत आहे. यापैकी मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला.त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण 28 जागांसाठी मतदान पार पडत आहे. तर गुजरातमधील 8 आणि उत्तर प्रदेशमधील 7 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. तिकडे ओडिशा, नागालँड, कर्नाटक आणि झारखंडमधील प्रत्येकी 2 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. तर छत्तीसगड, तेलंगाना आणि हरियाणातील प्रत्येक एका जागेसाठी मतदान सुरू आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच मध्य प्रदेशात होत असलेल्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. तर भाजपच्या आमदारांचे निधन झालेल्या ३ जागांचाही आजच्या पोटनिवडणुकीत समावेश करण्यात आला आहे.  पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. मध्यप्रदेशात सध्या भाजपकडे सध्या 107, काँग्रेसचे 87, बहुजन समाज पक्षाचे 2, तर समाजवादी पक्षाचा 1 आमदार आहे. तर 4 अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे बहुमताचा 116 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला अजून ९ आमदारांची गरज आहे. तर काँग्रेसला बहुमत मिळवण्यासाठी 28 पैकी 28 जागा जिंकाव्या लागणार आहेत. त्यामुळे इथं भाजपचा विजय सुकर मानला जात आहे.

कमलनाथांच्या आक्षेपार्ह व्यक्तव्यांनी निवडणूक गाजली

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप उमेदवार इमरती देवी यांना जाहीर सभेत आयटम संबोधल्याने एकच राजकारण सुरू झाले होते. कमलनाथांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचाही अगदी शेलक्या शब्दात समाचार घेतला. त्यामुळं निवडणूक आयोगाने त्यांचं काँग्रेसचे स्टार प्रचारक हे पद काढून घेतले. पण सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या आदेश रद्द ठरवला. त्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेची पोटनिवडणूक लक्ष्यवेधी ठरली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.