अवघ्या 60 हजारांत खरेदी करा 74 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देणारी बाईक

पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा सर्वात आधी विचार

0

मुंबई : बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच कमी किंमत आणि जास्त मायलेज देणाऱ्या एका बाईकची माहिती देणार आहोत.
भारतात एखादी व्यक्ती ऑफिसला, कॉलेजला जाण्यासाठी किंवा दररोज बराच वेळ प्रवास करत असेल तर त्याला एक, अशी बाईक हवी असते जी उत्कृष्ट मायलेज देईल. सोबतच त्या वाहनाची किंमत देखील कमी असेल. किफायतशीर किंमतीत अधिक मायलेज देणाऱ्या बाईक्स हल्ली प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासमोर एक बाईक घेऊन आलो आहोत जी तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि ती चांगले मायलेजदेखील देईल. ‘टीव्हीएस स्पोर्ट’ असे या बाईकचे नाव आहे.’
टीव्हीएस स्पोर्ट’ची सर्वात खास गोष्ट म्हणजे, या बाईकबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, ही बाईक 74 किलोमीटर प्रतिलिटर इतके मायलेज देते. या बाईकचे टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतका आहे. या बाईकमध्ये तुम्हाला 99.7 सीसीचे 4 स्ट्रोक सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानासह काम करते.

दमदार फीचर्स

या बाईकचे इंजिन 7350 आरपीएमवर 8.1 बीएचपी इतकी मॅक्सिमम ऊर्जा आणि 4500 आरपीएम वर 8.7 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. ‘टीव्हीएस स्पोर्ट’चे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकची लांबी 1950 मिलिमीटर, रुंदी 705 मिलिमीटर आणि उंची 1080 मिलिमीटर इतकी आहे तर व्हीलबेस 1236 मिलिमीटर आणि ग्राउंड क्लियरन्स 175 मिलिमीटर इतका आहे. ‘टीव्हीएस स्पोर्ट’च्या पुढच्या बाजूला 130 मिमी ड्रम ब्रेक आहे. तर मागील बाजूस 110 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी मागीला बाजूस सीबीएस फीचर देण्यात आले आहे.

किफायतशीर किंमत

या बाईकमध्ये 10 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. या बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक ऑईल डॅम्ड सस्पेंशन देण्यात आले आहे. त्याचवेळी, बाईकच्या मागील बाजूस 5-स्टेप एडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन देण्यात आले आहे. ‘टीव्हीएस स्पोर्ट’च्या किक स्टार्ट अलॉय व्हील व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 56,100 रुपये आहे. तर या बाईकच्या सेल्फ-स्टार्ट अ‍ॅलोय व्हील व्हेरिएंटची किंमत 62,950 रुपये इतकी आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.