…मात्र सरकार आमचेच बनणार असा विश्वास – राजदचा दावा

44 टक्के मतांची मोजणी पूर्ण, एनडीए 132 जागांवर आघाडीवर

0

पाटणा : बिहारच्या ट्रेंडमध्ये एनडीएने बहुमताचा आकडा पार केला. 3 वाजेपर्यंत 4.10 कोटी मतांपैकी 1.8 कोटी म्हणजे 44 टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. दरम्यान बिहारने बदल केला आहे. सर्व जिल्ह्यांमधून मिळणारी माहिती आमच्याच बाजूने आहे. महाआघाडीचे सरकार स्थापन होणार, असा दावा राजदचे खासदार मनोज झा यांनी माध्यमांशी बोलताना केला.

दुसरीकडे प्लूरल्स पक्षाच्या पुष्पम चौधरी यांनी ईव्हीएम हॅकिंगचा आरोप केला आहे. पुष्पम प्रिया चौधरी यांनी दुपारी 2 वाजता फेसबुकवर लिहिले की, बिहारमध्ये ईव्हीएम हॅक झाले आहे. प्लूरल्सची मते चोरून प्रत्येक बुथवर एनडीएला वर्ग होत आहेत. आम्हाला तर बहुमत नव्हते, पण एनडीएलाही बहुमत मिळणार नव्हते. प्लूरल्सच्या मत चोरीने त्यांना बहुमत मिळत आहे.

गजब बिहार, एका तासात दोन सरकार

तत्पूर्वी मंगळवारी सकाळी कल येऊ लागले, तेव्हा बिहारच्या खुर्चीची शर्यत आणखी रंजक बनली. अगदी सुरुवातीपासूनच महाआघाडी आघाडीवर होती. सकाळी 9 वाजेपर्यंत इतकी आघाडी घेतली होती की, त्यांचे सरकार बनेल, असे वाटत होते. मात्र एका तासानंतर संपूर्ण चित्र पालटले आणि नितीश कुमार यांची बाजी पलटली. एनडीए 120 च्या जवळ पोहोचताना दिसली. पुढील अर्ध्या तासात एनडीएने बहुमताचा आकडा पार केला. दरम्यान सध्या फक्त भास्करचा एक्झिट पोल खरा ठरताना दिसत आहे. ज्यामध्ये एनडीएला 120 ते 127 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता.

कलांनुसारचे अपडेट्स

 • 4:00 PM: NDA 133 आणि महाआघाडी 99 जागांवर पुढे. भाजपा 77, जदयू 48, राजद 63, काँग्रेस 20, लेफ्ट 16 जागांवर आघाडीवर.
 • 3:00 PM: NDA 128 आणि महाआघाडी 105 जागांवर पुढे. भाजपा 73, जदयू 49, राजद 66, काँग्रेस 21, लेफ्ट 18 जागांवर आघाडीवर.
 • 2:30 PM: NDA 128 आणि महाआघाडी 105 जागांवर पुढे. भाजपा 74, जदयू 47, राजद 67, काँग्रेस 19, लेफ्ट 18 जागांवर आघाडीवर.
 • 2:00 PM: NDA 134 आणि महाआघाडी 98 जागांवर पुढे. भाजपा 76, जदयू 52, राजद 61, काँग्रेस 18, लेफ्ट 19 जागांवर आघाडीवर.
 • 1 PM: NDA 127 आणि महाआघाडी 105 जागांवर पुढे आहेत.
 • 12.30 PM: NDA 129 आणि महाआघाडी 103 जागांवर आघाडी घेताना दिसत आहेत.
 • 12.00 PM: NDA 129 आणि महाआघाडी 100 जागांवर पुढे.
 • 11.30 AM: NDA 131 आणि महाआघाडी 101 जागांवर आघाडी घेताना दिसले.
 • 11 AM: NDA 130 आणि महाआघाडी 97 वर आले.
 • 10.30 AM: NDA 125 पर पहुंच गया आणि महाआघाडी 109 वर आले.
 • 10 AM: NDA वाढून 119 पर होते आणि महाआघाडी कमी होत 114 जागांवर आली होती.
 • 9 AM: महाआघाडी 120 जागांवर आघाडीवर होते. NDA ला 90+ जागांवर आघाडी होती.
 • 8.30 AM: कलांमध्ये महाआघाडी 60+ आणि NDA 40+ होते.

तीन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत 7.34 कोटी मतदारांपैकी 57.05% लोकांनी मतदान केले. 2015 मध्ये 56.66% मतदान झाले होते. यावेळी 3,733 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 3,362 पुरुष, 370 महिला आणि 1 ट्रान्सजेंडर आहे.

निवडणूक प्रचारातील चार मोठे चेहरे

नितीश कुमार : नितीश कुमार स्वतः मैदानात नव्हते, मात्र ते जदयूचा सर्वात मोठा चेहरा होते. त्यांनी 103 मतदारसंघात 113 सभा घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : मोदी काळातील ही पहिलीच निवडणूक होती, ज्यामध्ये अमित शाह गैरहजर होते. मोदीच प्रचाराचा सर्वात मोठा चेहरा होते. त्यांनी यादरम्यान बिहारमध्ये 12 सभा घेतल्या.

तेजस्वी यादव : महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. तेजस्वी यांनी 21 दिवसांत 251 सभा घेतल्या. त्यांनी दररोज सरासरी 12 सभा घेतल्या. यासोबतच त्यांनी 4 रोड शो देखील केले.

राहुल गांधी : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या प्रचारापासून लांब राहिल्या. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वढेरा देखील दिसल्या नाहीत. काँग्रेससाठी राहुल यांनीच प्रचाराचा मोर्चा सांभाळला. त्यांनी एकूण 8 सभा घेतल्या.

महाआघाडीने 122 जागा जिंकल्यास 31 वर्षांचे तेजस्वी सीएम होतील. ते एखाद्या मोठ्या राज्याचे आजवरचे सर्वात तरुण सीएम असतील. एम.ओ. हसन फारूक 30 वर्षांंचे असताना पुद्दुचेरीचे सीएम बनले होते. तेजस्वी आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघात होते. मात्र त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. एक्झिट पोल अचूक ठरल्यास वडिलांप्रमाणे सीएम ठरणाऱ्या नेत्यांमध्ये तेजस्वी यादव यांचाही समावेश होईल. तथापि, नितीशकुमार जर सरकार टिकवण्यात यशस्वी ठरल्यास ते सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनणारे पहिलेच नेते असतील.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.