ब्रँड अँबेसेडर नवेली देशमुख यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते गौरविले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य

0

औरंगाबाद :लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये नवमतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्याविषयी जनजागृती निर्माण केलेल्या, औरंगाबाद जिल्ह्यातील निवडणूक विभागाच्या ब्रँड अँबेसेडर तसेच शासनाच्या ”माझी कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेमध्ये पुढाकार घेऊन जनसामान्यात जनजागृती केलेल्या, मिस इंडिया युनिव्हर्सच्या उपविजेत्या नवेली देशमुख यांचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, मंदार वैद्य, संगीता सानप, अप्पासाहेब शिंदे आदींसह तसेच नवेली यांच्या आई प्रा. सुवर्णलता शिंदे, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, मराठवाड्याची कन्या असलेल्या नवेली देशमुख यांनी जिल्हा निवडणूक विभागाची ब्रँड अँबेसेडर म्हणून जबाबदारी सांभाळताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांचे या निवडणुकीतील कार्य उल्लेखनीय असेच आहे. युथ आयकॉन असल्याने नवमतदारांमध्ये मतदाना‍विषयी जनजागृती घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पार पाडलेले आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतल्याने मतदानाची टक्केवारी वाढवण्यात त्यांची भूमिका नक्कीच उपयुक्त ठरली आहे. रन फॉर डेमोक्रसी या उपक्रमाला तर नवमतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
नवेली देशमुख भरतनाट्यममध्येही पारंगत आहेत; राष्ट्रीयस्तरावरील बास्केटबॉल खेळाडूदेखील आहेत, असे सांगून नवेली देशमुख यांच्याही पुढील वाटचालीस जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी नवमतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती निर्माण केली. युथ आयकॉन असल्याने औरंगाबादकरांनीही माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. शासनाच्या ”माझी कुटुंब माझी जबाबदारी”मध्येही सहभाग घेऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये, याबाबत जनजागृती करता आली, याचा आनंद मला आहे. प्रशासनाच्या विविध उपक्रमांत सकारात्मकपणे सहभाग घेतला आहे, जनजागृतीही केली आणि यापुढेही करत राहणार असल्याचे मिस युनिव्हर्स नवेली देशमुख यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.