चिखली येथील बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

दोन्ही आरोपींना विशेष न्यायाधीश चित्रा एम. हंकारे यानी दोषी धरून फाशीची शिक्षा आज सुनावली

0

चिखली : चिखली येथील नऊ वर्षीय मुलीस पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करून जबर जखमी करणाऱ्या सागर विश्वनाथ बोरकर व निखील लिंबाज गोलाईत या दोन आरोपींना विशेष न्यायाधीश चित्रा एम. हंकारे यानी दोषी धरून फाशीची शिक्षा आज (दि.13) रोजी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल 2019 रोजी रात्री अंदाजे एक ते दोन वाजेच्या सुमारास आरोपींनी अल्पवयीन मुलीला स्कूटीवरुन पळवून नेले आणि स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत आळी-पाळीने बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी त्याचदिवशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा प्राथमिक तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यानी केला. त्यानंतरचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बाबूराव महामुनी यांनी केला. यासाठी पोलिस कर्मचारी शरद गिरी व महिला पोलिस कर्मचारी ज्योती मुळे यांनी सहकार्य केले. तपासाअंती दोषारोप पत्र येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने मुलीस पळवून नेतांना साक्षीदार शिवाजी साळवे, पंच शुभम भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. विजय खरपास, डॉ. मनीषा चव्हाण, डॉ. नूतन काळे, तसेच औरंगाबाद येथील तज्ञ डॉ. विजय कल्याणकर, डॉ. संजय पगारे, जात प्रमाणपत्रावरील साक्षीदार रवी टाले, राजू देशमुख , नायब तहसीलदार कुणाल झाल्टे, तपास अधिकारी गुलाबराव वाघ, उपविभागीय पोलिस अधिकारी महामुनी या साक्षीदारासह पीडित मुलीचा पुरावा नोंदविण्यात आला. साक्षी पुरावे हे घटनेला पूरक व एकमेकाशी सुसंगत असल्याने पीडित मुलीवर आरोपींनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर, ॲड. सोनाली सावजी यांनी काम पाहिले. यासाठी त्यांना पैरवी म्हणून पोलिस कर्मचारी सुनील पवार यांनी सहकार्य केले. पीडित मुलीला महिला व बालकल्याण सदस्य किरण राठोड यांनी सहकार्य केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.