चाळीस रुपयांची उधारी, वसूलीवरून मित्राचा गळा दाबून खून
इचलकरंजीतील करवीर तालुक्यातील धक्कादायक घटना
कोल्हापूर : केवळ चाळीस रुपयांची उधारी वसूल करण्याच्या कारणावरुन मित्राची गळा दाबून खून करण्यात आला. इचलकरंजीतील करवीर तालुक्यात ही घटना घडली. येथील अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे (वय 28) या तरुणाची गळा दाबून खून करण्यात आला.
करवीर तालुक्यातील वसगडे येथे राहणारा अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे (वय 28) आणि जगदीश नायकू कांबळे (वय 27) हे दोघे मित्र होते. नेहमीप्रमाणे काल रात्री ते समाजमंदिरात दारू पीत बसले होते. अनिल कांबळे हा जगदीश कांबळे याचे 40 रुपये देणे लागत होता. ती रक्कम जगदीश परत मागत होता. यामुळे दोघांत वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. जगदीश कांबळेने गळा आवळल्याने अनिल कांबळेचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला. तो निपचित पडल्यानंतर जगदीश घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना समजताच काही युवक आणि नातेवाईकांनी समाजमंदिरात धाव घेतली. त्यांनी तात्काळ अनिलला गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयात दाखल केले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इचलकरंजीतील करवीर तालुक्यात ही घटना घडली. येथील अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे (वय 28) या तरुणाची गळा दाबून खून करण्यात आला. वसगडे तालुका करवीर येथे काल रात्री उशिरा घडली. या प्रकरणातील संशयित आरोपी जगदीश कांबळे याला गांधीनगर पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती गांधीनगर पोलिसांना कळताच त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला रवाना केला आणि घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कृष्णात पिंगळे यांनी फरार संशयित जगदीश कांबळेला गावातूनच ताब्यात घेतले.