बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्री ड्रग्जप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात

आगामी चित्रपटांमधील कोट्यवधींंची गुंतवणूक अडचणीत?

0

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला. त्यानंतर रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शौविकने ड्रग्ज संदर्भातील खुलासा केला. आता ड्रग्ज कनेक्शन  बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्रीपर्यंत कसं पोहोचले, हेही समोर येत आहे. त्याचबरोबर चंदेरी दुनियेत ड्रग्ज नावाचा डर्टी पिक्चरही चालतो हेही व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून स्पष्टपणे समोर आले.

दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग बॉलिवूडमधील या हिरोईन्सनाही ड्रग्जचे गालबोट लागले. कारण त्यांचे कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग समोर आले आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील चंदेरी दुनियेमागचे भयान वास्तवही समोर आले. थिएटरच्या पडद्यावर झळकणाऱ्या या हिरोईन्स आता ‘एनसीबी’ समोर येत आहेत. या टॉप अभिनेत्रींचे मानधन पाहिले तर सर्वसामान्य माणूस संपूर्ण आयुष्यात याच्या जवळपासही कमाईचा विचार करु शकता नाही. दीपिका पादुकोण एक चित्रपटासाठी अंदाजे 7 ते 8 कोटी रुपये घेते. श्रध्दा कपूर एका चित्रपटासाठी अंदाजे 2 ते 3 कोटी रुपये घेते. रकुलप्रीत सिंगचंही मानधन अंदाजे 2 कोटींच्या घरात आहे. सारा अली खानंही एका चित्रपटासाठी अंदाजे 1 ते दीड कोटी रुपये घेते. चाहते यांना मोठं करतात. नाव आणि पैसाही मिळतो. मात्र या पैशाचा उपयोग ड्रग्जसाठी होतो का? असा प्रश्न चाहत्यांना पडला. या कारवाईनंतर आता बॉलिवूडचंही आर्थिक गणित ढासळणार की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. यातील बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हे यातले सगळ्यात मोठे नाव आहे.

आपल्या अभिनयाने अनेकांना भूरळ घालणाऱ्या दीपिकाने हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आपला डंका वाजवला. किंग खानसोबत ओम शांती ओम या सिनेमातून पदार्पण केल्यानंतर दीपिकाने कधीच मागे वळून बघितले नाही. बचना ए हसिनो, लव्ह आजकल, कॉकटेल, रामलीला, पिकू, चेन्नई एक्सप्रेस, बाजीराव मस्तानी, पद्मावत, छपाक असे एकापेका एक सरस चित्रपट दीपिकाने दिले. दीपिकाचे आगामी काळात सपना दीदी आणि पठाण हे दोन चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचीही चौकशी होणार आहे. तीन पत्ती या सिनेमातून करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रध्दा कपूरला खरी ओळख आशिकी 2 या सिनेमातून मिळाली. त्यानंतर एक व्हिलन, बागी, हाफ गर्लफ्रेण्ड, स्त्रीसारखे अनेक हिट चित्रपट श्रध्दाने दिले. आगामी काळात श्रध्दाचे स्त्री 2 आणि लव्ह रंजन दिग्दर्शित एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. साऊथमध्ये दबदबा निर्माण करणारी रकुलप्रीत सिंगही ड्रग्जच्या फेऱ्यात अडकली. यारी या सिनेमापासून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी रकुलप्रीत सिंग साऊथमध्येच रमली. बॉलिवूडमध्येही तिने अय्यारी, दे दे प्यार दे सारखे वेगळे चित्रपट केले. अजय देवगणसोबतचा तिचा दे दे प्यार दे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आगामी काळात अर्जुन कपूरसोबत एका रोमँटिक सिनेमातही ती दिसणार आहे. ड्रग्जच्या चौकटीत अडकलेली आणखी एक अभिनेत्री म्हणजे दिग्गज अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. ती बॉलिवूडची नवी रायझिंग स्टारच आहे. तिने पदार्पणातच केदारनाथ आणि सिंबा सारखे सुपरडुपरहिट चित्रपट दिले.

लव्ह आजकल 2 मधल्या तिच्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधले. विशेष म्हणजे आगामी वरुण धवनसोबतच्या कुली नंबर 1 या सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलप्रित सिंह आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण करणाऱ्या अभिनेत्री आहेत. मात्र आता त्यांचे नाव अभिनयाबरोबरच ड्रग्ज प्रकरणी देखील घेतले जात आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव कशामुळं आले? बॉलिवूडमधील ड्रग्ज संदर्भातलं वास्तव काय? याचा एनसीबी च्या अधिकाऱ्यांशी सामना झाल्यावरच पर्दाफाश होणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.