‘छत्रपती संभाजी राजे साखर’ कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ

दिवाळीनंतर सरकी तेल उत्पादनाच्या प्रकल्पाला प्रारंभ

0

करमाड  : छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक हरिभाऊ बागडे यांनी भावाची चर्चा करण्यापेक्षा एकरी शंभर टन उसाचे उत्पादन कसे घेता येईल, यासाठी वेगवेगळे प्रयोग करा, असे आवाहन  आज गुरूवारी  १५ ऑक्टोबर रोजी बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बोलताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले.
विठठल मंदिर, धोंडराई ता गेवराई या संस्थानचे ह भ् प महंत १०८ रामदास महाराज यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगाचे बॉयलर अग्नी प्रदीपन  करण्यात आले.

छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगाचे बॉयलर अग्नी प्रदीपन विठठल मंदिर, धोंडराई (ता गेवराई) या संस्थानचे ह भ् प महंत १०८ रामदास महाराज, कारखान्याचे उपाध्यक्ष दामोदर नवपुते व त्यांच्या सहचारिणी पदमाबाई नवपुते यांच्या हस्ते विधीवत बाॅयलर पूजन करण्यात आले.  हरिभाऊ बागडे  म्हंणाले की, कारखाना परिसरात ऊस नसल्याने गेल्या १९ वर्षापासुन दूरवरून ऊस आणावा लागत आहे. त्यामुळे कमी-अधिक उसाचे गाळप झाले असेल. परंतु गाळप कधीही  बंद पडू दिले नाही. असे असतानाही कारखान्यांनी कोजन, इथेनॉल प्रकल्प उभे केले. दिवाळीनंतर सरकी तेल उत्पादनाच्या प्रकल्पाला प्रारंभ होईल. येत्या काळात दालमिल व मद्यनिर्मीती उद्योग समूहाच्या विचाराधीन आहे. यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असून नागरिकांनी छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग समूहाचे शेअर्स घेण्याचे आवाहन हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केले. प्रारंभी रामदास महाराज म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगाने उस बागायतदारासह ऊस तोडणी कामगार वाहतूक ठेकेदार कर्मचारी वर्गाचे हित जोपासल्याने कारखाना नावारूपास आला. सर्वांना समान लेखणारे नेतृत्व मिळाल्याने कारखान्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती होईल, असे आशीर्वादपर उदगार त्यांनी काढले. याप्रसंगी संचालक प्रल्हाद पन्हाळे व राधाकिसन पठाडे यांची भाषणे झाली.  या कार्यक्रमास सर्वश्री प्रल्हाद पन्हाळे, हरिश्चंद्र लहाने, देवजीभाई पटेल, दत्तराज किन्नुर, डॉ हिरू गुरसहानी, प्रकाश काकडे, राधाकिसन पठाडे, भागचंद ठोंबरे,श्रीराम शेळके, सजनराव मते, रामकिसन भोसले, गणेश दहिहंडे, दादासाहेब औताडे, शहादेव बागडे, संतोष गावंडे, भास्कर काकडे, प्रकाश चांगुलपाये, ज्ञानेश्वर ठोंबरे, हकिम पहेलवान , चंद्रकांत घुगे, योगराज देशमुख आदींची उपस्थिती होती कारखान्याचे अधिकारी बाळासाहेब बागडे, राजेंद्र भागवत , नानाभाऊ कुटे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी व कामगार आदींची उपस्थिती होती. मुख्य व्यवस्थापक  दिगंबर बडदे यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष दामोदर नवपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.