‘बीएमडब्ल्यू’ची शानदार बाईक लाँचसाठी सज्ज! दमदार फिचर्स, रायडर्स आकर्षित

दोन नव्या अपडेटेडसह बाईक पुढच्या आठवड्यात होणार लाँच

0

मुंबई : बीएमडब्ल्यू मोटरराड इंडिया 8 ऑक्टोबर 2020 ला अपडेटेड जी 310 आर (बीएमडब्ल्यू जी 310 आर) आणि जी 310 जीएस (बीएमडब्ल्यू जी 310 जीएस) या दोन बाईक लाँच करणार आहे. लाँचिंगच्या एक आठवडा अगोदर कंपनीने नव्या बीएमडब्ल्यू जी 310 जीएसचे फोटो प्रसिद्ध केले. या फोटोंमध्ये 310 जीएस मॉडेल जास्त आकर्षक दिसत आहे.

या बाईकमध्ये बीएस 6 कंप्लिट इंजिनासह काही नवीन अपडेट्स करण्यात आले आहेत. बाईकमध्ये करण्यात आलेल्या सर्व बदलांची कंपनीने माहिती दिली आहे. त्यानुसार यामध्ये बाईकची स्टाईल आणि इंजिनात बदल करण्यात आले आहेत. बाईकच्या डिझाईनचा विचार केला तर बाईकमध्ये एक नवीन हेडलाईट देण्यात आले. त्यासोबतच एक एलईडी डे टाईम रनिंग लाईट स्ट्रीप आहे. फ्यूल टँकवर दोन मोठ्या आणि वेगळ्या फोन्टमध्ये जीएस लिहिले आहे. तसेच तिथे ‘Rallye’ स्टिकर लावण्यात आले आहे. ही बाईक दोन नवी रंगांच्या ऑप्शनसह लाँच केली जाणार आहे. या बाईकच्या टायरमध्ये बदल करण्यात आला आहे. बाईकमध्ये सेल्फ-बूस्टिंग अँटी-होपिंग क्लच, एक इलेक्ट्रोमोटिव्ह थ्रॉटल कंट्रोलर देण्यात आला आहे. राइड-बाय-वायर सिस्टमसोबत अॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच हँड लीवरसुद्धा देण्यात आले आहे. या नव्या बाईकमध्ये टीएफटी इंस्ट्रूमेंट कन्सोल देण्यात आलेलं नाही. स्टूडियो शॉट्समध्ये बाईकला एक सेंटर स्टँड दिलंय जे जुन्या मॉडेलमध्ये नव्हतं. अपडेट केलेल्या बीएमडब्ल्यू जी 310 जीएस मध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल देण्यात आले आहे. बीएमडब्ल्यू जी 310 आर आणि जी 310 जीएसचं इंजन अपाचे आरआर 310 सारखं आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणे 6-स्पीड गियरबॉक्स असेल परंतु स्लिपर आणि असिस्ट क्लच असेल की नाही, याबाबत सांशकता आहे. अपडेट केलेल्या जी 310 ड्युअलसाठी बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.