ब्राझीलच्या तुरुंगात कैद्यांचे दोन गट भिडले, 57 आरोपींचा मृत्यू

0

ब्राझीलच्या पारा राज्यातील तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याने 57 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. यात 16 जाणांचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले. ही घटना ब्राझीलच्या अल्टमीरा तुरुंगात घडला आहे.

अल्टमीरा तुरुंगात सकाळी 7 वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली. एका गटाने दुसऱ्या गटाच्या सेलला आग लावली. या आगीत अनेक कैद्यांना जीव गमवावा लागला, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले.

तुरुंगात एक गट सकाळी नाश्तासाठी बसलेला होता. त्यावेळी दुसऱ्या गटाच्या कैद्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अनेक कैदी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. त्यामुळे एका गटाला दुसऱ्या तुरुंगात स्थालांतरित करा, त्यामुळे वादही होणार नाहीत, अशी मागणी कैद्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.