माहेश्वरी मंडळ प्रभागाचे रक्तदान शिबीर संपन्न , 111 बॅग रक्त संकलित !

0

औरंगाबाद  :  श्री बांगड माहेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी व माहेश्वरी मंडळ औरंगाबाद, हडको प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर योगेश्वरी बालविकास मंदिर एन 9 येथे संपन्न झाले. माहेश्वरी मंडळ सातत्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. यंदाचे मंडळाचे रक्तदान शिबीराचे पाचवे वर्षे आहे. लायन्स क्लबच्या लायन्स ब्लड बँकेच्या सहयोगाने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले .रक्तदान शिबिराबरोबरच मेडिकल हेल्थ चेकअप आणि ब्लड शुगर टेस्ट, युरिक ऍसिड इ. तपासणी देखील करण्यात आल्या. डॉ. गौरव बाहेती यांनी या तपासणी केल्या. 111 बॅग रक्त या रक्तदान शिबिरामध्ये संकलित करण्यात आले . लायन्स ब्लड बँकेचे डॉ. एन .सी. डोळे, डाॅ. प्रकाश पत्री, पीआरओ विशाल जैन व त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने रक्त संकलित करण्यात आले. यावेळी माहेश्वरी मंडळाचे प्रभाग प्रमुख महेंद्र काबरा , प्रभाग उपप्रमुख सपना राठी, प्रभाग सचिव जयप्रकाश बाहेती, कोश प्रमुख मंगेश केला , संघटन प्रमुख सुनंदा दाड, प्रमोद दाड, ओमप्रकाश लड्डा, बालाप्रसाद दरक, पुनम दरक कुणाल काबरा, चेतन काबरा, जगदीश कलंत्री यांची विशेष उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.