‘असदुद्दीन ओवेसींचा वापर करुन घेण्याची भाजपची रणनीती ठरली यशस्वी’

असदुद्दीन ओवेसी यांनी यंदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतल्या 100 सभा

0

नवी दिल्ली:  बिहार विधानसभेच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचा वापर करून घेण्याची भाजपची रणनीती बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरली, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी केले.

भाजपच्या या रणनीतीपासून भविष्यात सेक्युलर पक्षांनी सावध राहिले पाहिजे. ओवेसी यांच्या पक्षामुळे महागठबंधनची मते कापली गेली, असा दावा अधिर रंजन चौधरी यांनी केला.  असदुद्दीन ओवेसी यांनी यंदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 100 सभा घेतल्या होत्या. त्यामुळे सीमांचल भागातील राजकीय समीकरणे बदलली होती. बिहारमधील एकूण 20 उमेदवारांपैकी सीमांचल प्रांतात एमआयएमने आपले 14 उमेदवार उभे केले होते. यापैकी तीन जागांवर एमआयएम आघाडीवर आहे. तर दोन जागांवर एमआयएम दुसऱ्या स्थानावर आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजला झटका देण्यासाठी 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, ओवेसी यांच्या या रणनितीने भाजप्रणित एनडीएला सर्वाधिक फायदा झाल्याचे समोर येत आहे. तर महागठबंधनला खूप मोठा फटका बसताना दिसत आहे. सीमांचल प्रांतात विधानसभेच्या एकूण 24 मतदारसंघापैकी 11 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर महागठबंधन फक्त पाच जागांवर आघाडीवर दिसत आहे. उर्वरित आठ जागांवर इतर आघाडीवर असल्याचं समजत आहे. यामध्ये एमआयएम तीन जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. ओवेसी यांचा पक्ष अमौर आणि कौचाधामन मतदारसंघात आघाडीवर दिसत आहे. काही मतदारसंघांमध्ये एमआयएम भलेही पिछाडीवर असले तरी या पक्षामुळे महागठबंधनला मोठा फटका बसला आहे. परिणामी, त्याचा फायदा भाजपला जास्त झाल्याचं दिसत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.