भाजपचे आज वाढीव वीजबिलांविरोधात राज्यव्यापी आंदोलन

वीजबिल होळी आंदोलन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात

0

मुंबई : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, महाराष्ट्र व पं. बंगालच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही, असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. गर्दी, दाटीवाटी करत आहेत. मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात भाजपवाले कोरोना वाढवत आहेत,’ असा घणाघाती आरोप शिवसेनेने केला आहे. अद्याप दीड वर्षे लांब असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याचे आवाहन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना दुखावली गेली आहे. त्या वक्तव्याचा संदर्भ देत शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. वाढीव वीजबिलांच्या विरोधात भाजपने पुकारलेल्या आंदोलनाच्या निमित्तानं शिवसेनेने हा निशाणा साधला आहे.

‘दुसऱ्या विश्वयुद्धानंतर कोरोना हेच सगळ्यात मोठे संकट आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, असे मोदींनी म्हटले आहे. मात्र, आपल्या देशात दिव्याखाली अंधार आहे. कोरोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून ‘शुद्ध’ भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असे मोदींच्या भक्तांनी ठरवून टाकले आहे. भाजपतर्फे मुंबई-महाराष्ट्रात वाढीव वीजबिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा केला. तोंडास मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, वाहतुकीसंदर्भात नियमांचे पालन नाही. कोरोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला, तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे. आपल्या या राजकीय गोंधळातून मुंबई-महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढत आहे याचे भान त्यांनी ठेवावे,’ असा खोचक सल्ला शिवसेनेने दिला आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. सरकार कोरोनाशी लढण्यात अपुरे पडते असे एका बाजूला बोंबलायचे आणि त्याचवेळी नियमबाहय़ राजकीय गोंधळ घालून कोरोनाचा प्रसार वाढवायचा. कोरोनाची दुसरी ‘लाट’ आपल्या राजकीय विचारांची आहे, असे भाजपला वाटते. उठसूट बोंबा मारत रस्त्यावर उतरायचे. लोकांची गर्दी गोळा करून त्यांसध्या राज्यात वाढीव वीजबिलांवरून राजकारण चांगलंचा तापल्याचे दिसत आहे. राज्यातील वीजग्राहकांना वाढीव वीजबिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिले ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वीजबिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अशातच भाजपकडून आज राज्यभरात वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज भाजप वीजबिलांची होळी करणार आहे. वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होत भाजप राज्य सरकारला शॉक देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी भाजप वीजबिल होळी आंदोलन करणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

भाजपच्या वीजबिल होळी आंदोलनासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीजबिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीजबिल माफ करणार नाही, असे म्हटले.’ पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी भाजपाने वीजबिल होळी आंदोलन पुकारले आहे. जनतेने यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो.’ भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार सहभागी होणार आहे. यांच्यासह इतरही नेते या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वीजबिलावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप, असा वाद आता रंगताना दिसत आहे. वीजबिल कमी करून देणार, अशी घोषणा केल्यानंतर हे सरकार शब्दावरून फिरले, हे विश्वासघातकी सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. तर भाजपच्या काळात वीजबिलांची प्रचंड थकबाकी झाल्याचा पलटवार ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. भाजपची सत्ता राज्यात असताना पाच वर्षांत महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

वाढीव वीजबिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा राज्यात उग्र आंदोलन करू : मनसे

वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर मनसेही आक्रमक झाली असून उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने ठाकरे सरकारला देण्यात आला आहे. वाढीव वीजबिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा राज्यात उग्र आंदोलन करू, असे अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. “वाढीव वीजबिलात सवलत दिली जाईल, असे सरकारनेच जाहीर केले होते. परंतु दिलासा देण्यास सरकारने नकार दिला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा,” असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अशातच मनसेच्या वतीने 26 नोव्हेंबरला वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

‘वीज कापायला आले तर मनसैनिक तुमच्यासोबत’; वीजबिले न भरण्याबाबत मनसेचे आवाहन

” महाराष्ट्रातील जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. वीज मंडळाचे लोक वीज कापण्यासाठी आले तर मनसैनिक तुमच्यासोबत असतील. यावेळी काही अनुचित घडले तर याची जबाबदारी सरकारची असेल. सर्वसामान्यांची वीज कापणार असाल तर तुमचे वीज कनेक्शनही कापल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहा अन्यथा आपापल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे काढा,” असे बाळा नांदगावकर म्हणाले. नागरिकांना कोरोनाच्या गुहेत ढकलायचे हे काय माणुसकी असलेल्या पक्षाचे लक्षण आहे?,’ असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.