…भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वाट बघताहेत 32 तारखेची, मुगेरीलालचे न पूर्ण होणारे स्वप्न

0

मुंबई : “भाजपला रात्रीचा बदल घडवण्याची सवय लागली. त्यामुळे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघत आहेत. 32 तारीख कधी येईल? कधी त्यांची पहाट उजाडेल, कधी त्यांना त्या पहाटेचा सूर्य दिसेल?”, असे प्रश्न करत शिवसेना नेते आणि कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टोला लगावला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना एखाद्या पहाटे काहीही घडू शकते, असे विधान केले. त्यांच्या या विधानाबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता, त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. “भाजपचा रात्रीचा खेळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे. पण मुंगेरीलाल के सपने कभी पुरे नही होते. ते स्वप्न फक्त स्वप्नच राहतात. माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे की, कमीत कमी लोकांची दिशाभूल करू नका”, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं. “देशामध्ये मोजके जे मुख्यमंत्री आहेत, त्यामध्ये संयमी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. त्यांचे नाव देशभर घेतले जात आहे. मग त्यांचे राज्यात नाव घ्यायला काय हरकत आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संयमी आहेत, असे केंद्रातील अनेक मंत्री म्हणतात”, असे सत्तार म्हणाले. “महाराष्ट्र सरकारचा केंद्रबिंदू उद्धव ठाकरे आहेत. या संकट काळात नियोजनबद्ध राज्य चालवण्याचे काम उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. महाविकास आघाडीचे नेते ज्यापद्धतीने काम करत आहेत ते पाहून पुढचे पाच वर्षे चंद्रकांत पाटील यांचे अशाप्रकारचे स्वप्न ऐकायला मिळेल”, असा चिमटा अब्दुल सत्तार यांनी काढला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.