सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राच्या बदनामीचे भाजपाचे कारस्थान उघड

"महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांचा शोध घ्या", सचिन सावंत यांची भाजपावर टीका

0

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील महाराष्ट्राच्या बदनामीचे भाजपाचे कारस्थान उघड झाले आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. सुशांत सिंह प्रकरणात एम्सचा विशेष अहवाल आल्यानंतर सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली .

सुशांत सिंहची हत्या झाली नाही तर त्याने आत्महत्याच केली असल्याचा अहवाल दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे. या अहवालानंतर सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली. “महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या तसेच या कारस्थानाचे मास्टर माईंड शोधण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एसआयटी गठीत केली पाहिजे”, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. “सुशांतसिंह राजपूत केसमध्ये तपासणी करणाऱ्या एम्सच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. या फॉरेन्सिक टीमने आपल्या अखेरच्या अहवालामध्ये सुशांतचा मृत्यू आत्महत्येममुळेच झाल्याचे म्हटले. एम्स”च्या एक्सपर्ट पॅनेलने सुशांतचा गळा दाबून हत्या करण्याच्या संभावतेला धुडकावले आहे”, असेही सचिन सावंत म्हणाले. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हत्येसह अनेक संशय व्यक्त करण्यात आले होते. मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, या शवविच्छेदन अहवालात योग्य माहिती न देण्यात आल्याने कूपर रुग्णालयाच्या या अहवालावरदेखील संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे ‘एम्स”च्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमून या अहवालाचा पुन्हा अभ्यास केला गेला. ‘एम्स”च्या  या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा अहवाल सादर केला. या अहवालानुसार सुशांतवर कोणताही विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर त्यांनी आता सुशांतच्या हत्येची शक्यताही नाकारली. सगळ्या तपासाअंती सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, तर सगळ्या गोष्टी त्याने आत्महत्या केली असावी, याकडेच इशारा करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.