जळगावात एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू

0

जळगाव : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाल्याचे बोलले जात आहे .एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खान्देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपमधील अनेक मोठे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा खडसेंनी केला होता. आता त्याचाच प्रत्यय येत आहे. मुक्ताईनगरमध्ये आज 60 भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला ओहोटी लागल्याची चर्चा रंगली होती. मात्र, वर्षभरात हे चित्र बदलताना दिसत आहे. आता एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खान्देशात राष्ट्रवादी आणखी बळकट होताना दिसत आहे.
दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांना भाजप कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता, कोणत्याही नगरसेवकाने, जिल्हा परिषद सदस्याने राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्ट केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.