राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचे भाजप खासदार सुनबाईंनी केले स्वागत

खडसेंचे मूळगावी कोथळी येथे ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजीत जंगी स्वागत

0

जळगाव : एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी  आले. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचे औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केले. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी  आले. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचे औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केले. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचे रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे काल जळगावात पोहोचले. त्यानंतर ते आज पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांच्यासह मूळगावी कोथळीत पोहोचले. यावेळी त्यांचं ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच नाथाभाऊ जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. त्यानंतर नाथाभाऊंना पुष्गुपच्छ देऊन स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची  रिघ लागली. या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करत करत खडसे यांनी त्यांच्या घराकडे मार्गक्रमण केले. दारात येताच, रक्षा खडसे आणि मंदाकिनी खडसे यांनी खडसे यांचे औक्षण करत त्यांचे घरात स्वागत केले. खडसे यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर खडसेंच्या निवासस्थानी असून त्यांची चर्चा सुरू आहे. काहीवेळ कोथळीत थांबल्यानंतर एकनाथ खडसे हे मुक्ताई नगरमधील त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. तिथे गेल्यावर ते आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. पुढील वाटचालीबद्दल ते या सर्वांशी हितगूज साधणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.