शरद पवारांवर टीका करताना भाजपा आमदाराची घसरली जीभ

शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ठाकरे सरकारवर त्यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका

0

मुंबई : ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णव गोस्वामींना अटक केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून, ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. विशेष म्हणजे अर्णव गोस्वामी प्रकरणात टीका करताना योगेश सागर यांची जीभ घसरली. शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ठाकरे सरकारवर त्यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला. परमबीर सिंह यांच्याविरोधात खटले सुरू असून, त्यांच्यावही योगेश सागर यांनी गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे भाजपा आमदार आशिष शेलारांनीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील मीडियासाठी काळा दिवस असल्याचे आशिष शेलार म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे आता शांत आहेत, माीडिया, सामान्य माणूस आणि नागरिक त्रस्त आहेत, असेही टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडले. एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली… सरकारविरोधात सोशल मीडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले… आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस… महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने?, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला. दरम्यान, 2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.