अजित पवारांच्या भेटीला भाजप आमदार शिवेंद्रराजे, राजकीय चर्चेला उधाण
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांची भेट
पुणे : साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या तासाभरापासून शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवारांमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही भेट नेमकी कशासाठी आहे, याचे नेमके कारणं अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची भेट घेणार आहेत. तर दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमालाही अजितदादा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचा लोकापर्ण सोहळाही पार पडणार आहे. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून या रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. एकूण आठ रुग्णवाहिकांचा लोकापर्ण सोहळा अजितदादांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित असतील