शिवसैनिक हत्याकांडप्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले अटकेत

0

अहमदनगर : केडगाव येथील शनिवारी (7 एप्रिल) राजकिय वादातून दोन शिवसेनेच्या उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयाने 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तसेच राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनाही आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाजी कर्डिले यांच्यावर हत्येचा कट रचणे आणि पोलिस अधीक्षक कार्यालायची तोडफोड करण्याचे गुन्हे आहेत. त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे आहेत. तसेच ते कोतकर कुटुंबीयांचे व्याही आहेत.

आरोपी संग्राम जगताप 

आमदार संग्राम जगताप यांचे वडिल आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोटनिवडणूक जिकलेल्या विशाल कोतकरचे वडिल बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांनाही अटक केली आहे.

अहमदनगरमध्ये शनिवारी घडलेल्या हत्याकांडात दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 

काय आहे प्रकरण ?

अहमदनगर येथील पोटनिवडणूकीवेळी हे प्रकरण घडले. राजकिय वादातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या केली. निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्यावर शनिवारी (7 एप्रिल) सुवर्णनगर परिसरात गोळ्या झाडण्यात आल्या, तसेच त्यांच्यावर गुप्तीनेही वार केले. या निवडणूकीपूर्वीच शिवसेना आणि काँग्रेसमध्ये राजकिय वाद उफळला होता. त्यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. त्याचाच हा सूड घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.