कार्यकर्त्याच्या लग्नात भाजप आमदार कुचेंचा डान्स; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बदनापूर तालुक्यातील लोणगावच्या कार्यकर्त्याचे भोकरदन तालुक्यातील उमरखेड येथे होते लग्न

0

जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदनापूरमधील लोणगावच्या एका कार्यकर्त्याचे भोकरदन तालुक्यातील उमरखेड येथे लग्न होते. कार्यकर्त्यांनी आमदार नारायण कुचे यांना नाचण्याचा आग्रह धरला. नारायण कुचे यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता डीजेवर चांगलाच ठेका धरला. हा व्हीडिओ त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या लग्नात चित्रीत करण्यात आला होता.

बदनापूर तालुक्यातील लोणगावच्या एका कार्यकर्त्याचे भोकरदन तालुक्यातील उमरखेड येथे लग्न होते. या लग्नाला आमदार नारायण कुचे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार नारायण कुचे यांना नाचण्याचा आग्रह धरला. बदनापूर तालुक्यातील लोणगावच्या एका कार्यकर्त्याचे भोकरदन तालुक्यातील उमरखेड येथे लग्न होते. नारायण कुचे यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता डीजेवर चांगलाच ठेका धरला. बराचवेळ ते कार्यकर्त्यांच्या गर्दीत हात उंचावून नाचत होते. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. निमंत्रित कवींच्या संमेलनात सहभागी झालेल्या सुरेश धस यांना कार्यकर्त्यांनी कविता प्रस्तुत करण्याची विनंती केली. सुरेश धस यांनी मला कविता येत नाही, पण मी गाणे म्हणतो, असे सांगत सूर छेडले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.