पोटनिवडणुकीत भाजपची आघाडी, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का

बिहार विधानसभा निवडणुकीसह 10 राज्यांमध्ये पोटनिवडणुकीसाठीही मतमोजणी सुरू

0

भोपाळ : बिहार विधानसभा निवडणुकीसह 10 राज्यांमध्ये पोटनिवडणुकीसाठीही मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. यामध्ये भाजपने  आघाडी घेतली आहे.

मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी दोन जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशमध्ये  भाजप 2 जागेवर आघाडीवर आहे. कोरोनाच्या परिस्थितीत सर्व नियमांचे पालक करून पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मतमोजणी केंद्रात फक्त एका व्यक्तीला हजर राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच मध्य प्रदेशमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं पोटनिवडणूक होत आहे. एकीकडे देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली होती तर दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये मार्च महिन्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते. एकाच वेळी 22 आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आणि कोसळले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे समर्थक 22 आमदारांनी काँग्रेसची साथ सोडली होती. ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये दाखल झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 विधानसभा जागा आहे, यात भाजपकडे 107, काँग्रेसकडे 87, बसपा दोन, सपा 1 आणि 4 अपक्ष आहे.  पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दमोह येथून काँग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाले. मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 115 बहुमताचा आकडा गाठणे गरजेचं आहे. भाजपला आणखी 8 जागांची गरज आहे. तर काँग्रेसला 28 जागा जिंकाव्या लागणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.