भाजप नेत्या पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

दोन दिवसांपासून सर्दी खोकला असल्याने स्वतःला ठेवले विलगीकरणात

0

बीड : नुकतीच पदवीधर विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या ऐन एकदिवस आधी, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची तब्येत अचानक खराब झाली होती. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. पंकजा मुंडे म्हणाल्या  ‘माझी कोविडची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि काळजी व्यक्त केली त्यांचे आभार!

पंकजा मुंडेंनी आपल्या तब्येतीविषयी अपडेट दिले आहे. ‘माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे’ अशी माहिती त्यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी ‘मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की, आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे, त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आायसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.