भाजपला खिंडार! ठाणे, पालघर जिल्ह्यांतील या नेत्यांनी धरला काँग्रेसचा ‘हात’

भाजपमधील अंतर्गत गटबाजी आली चव्हाट्यावर... पदाधिकाऱ्यांनी आज अखेर भाजपला रामराम

0

भिवंडी : ठाणेसह पालघर  जिल्ह्यात भाजप पक्षांतर्गत गटबाजी  चव्हाट्यावर आली. कंटाळलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज अखेर भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये  प्रवेश केला. परिणामी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत भाजप खिळखिळी होताना दिसत आहे.

भाजपच्या कंटाळलेल्या पदाधिकाऱ्यांनी आज अखेर भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये  प्रवेश केला. परिणामी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत भाजप खिळखिळी होत आहे. ठाणे, पालघर विभागीय भाजप जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम चौधरी  यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनतर ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, दयानंद चोरघे यांनी त्यांनीही आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ तुकाराम चौधरी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दयानंद चोरघे हे 2014 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. ते अगोदर काँग्रेसमध्ये ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष होते. तर निरीक्षक म्हणूनही काम पाहिले होते. मात्र, नरेंद्र मोदींच्या लाटेत ते भाजपवासीय झाले. भाजपमधील गटबाजी आणि नातेवाईकांचे पुनर्वसन सुरू असल्याने या सर्व बाबींना कंटाळून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला. आता काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाल्याने काँग्रेसची ताकत वाढू लागल्याचे पाहावयास मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करायचे आहेत, असे सूचक विधान देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही परतलेले रणजितसिंह देशमुख यांचे त्यांनी स्वागत केले. रणजितसिंह देशमुख यांच्यावर आमच्याकडून अन्याय झाला, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. रणजितसिंह हे अत्यंत तडफेने काम करणारे नेते आहेत. आपण तीन पक्ष सत्तेत आहेत, त्यातून पक्ष बळकट करायचा आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, रणजित देशमुख यांनी सूतगिरणी यशस्वी केली, याचे काय रहस्य आहे. हे त्यांनाच विचारावा लागेल. तर पृथ्वीराज चव्हाण हे देशपातळीवरील नेते आहेत. राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी त्यांचे मार्गर्शन लागणार आहे. म्हणून साताऱ्यातील जबाबदारी तरुणांनी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा काँग्रेसला वैभव मिळवून देण्याचे काम आपले आहे. थोड्या अडचणी आहेत, पण आपल्याला परिश्रम घ्यायचे आहेत. आपण जनतेसाठी काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही मोठे व्हा, पक्ष आपोआप मोठा होईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी रणजितसिंह देशमुख यांना उद्देशून सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.