नाशिकमध्ये भाजपला खिंडार? अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; सुधाकर बडगुजरांचे वक्तव्य

काल झाले ते प्रवेश फक्त ‘झांकी’है. भाजपचे बडे नेते अभी ‘बाकी’ है, : सुधाकर बडगुजर

0

नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अशात शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचे मोठे विधान शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केले. बुधवारी शिवसेनेमध्ये असलेल्या बाळासाहेब सानप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली. काल झाले ते प्रवेश फक्त ‘झांकी’ आहे. भाजपचे बडे नेते अभी ‘बाकी’ आहे, अशा शब्दात सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना इनकमिंगविषयी सूचक वक्तव्य केले.

भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये शिवसेनेत मोठे इनकमिंग होणार असल्याचे विधान बडगुजर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भाजपची अवस्था बिकट होणार असल्याचेही सुधाकर बडगुजर म्हणाले. त्यामुळे खरंच जर नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडले तर हा आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे. दरम्यान, बाळासाहेब यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेत पोकळी निर्माण झाल्याचे बोलले जात होते. अशात ही तर फक्त सुरुवात आहे, महाविकास आघाडीचे अनेक नेते हे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याचे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर कोणत्या पक्षात इनकमिंग होते हे येता काळच सांगेन.

महत्त्वाचे म्हणजे नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळून आठवडा होत नाही, तोच भाजपला सुरुंग लागला. भाजपचे काही बडे नेते आणि नगरसेवक पुढच्या आठवड्यात सेना प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत सोमवारीत भाजपमध्ये घरवापसी केली. मात्र सानप यांच्या प्रवाशाने भाजपमधील अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातूनच भाजपचे नाशकातील दिग्गज नेते आणि नगरसेवक शिवबंधन हाती बांधण्याची शक्यता आहे. भाजपच्या उद्योग आघाडीचे पदाधिकारीही मुंबईत शिवसेना प्रवेश करणार आहेत. प्रवेशावेळी शिवसेना कार्यालयाला ते अॅम्ब्युलन्स भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.