भाजपकडून राज्य प्रभारींची यादी जाहीर; पंकजा मुंडे यांची मध्यप्रदेशसह प्रभारीपदी नियुक्ती

सुनील देवधर यांची आंध्रप्रदेशसह तर विजया रहाटकरांची दमन दीव-दादरा- नगर हवेली प्रभारीपदी

0

नवी दिल्ली :  भाजपने 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी व सहप्रभारींची यादी जाहीर केली आहे. पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश भाजप प्रभारीपदी नियुक्ती केली.

भाजपने 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी व सहप्रभारींची यादी जाहीर केली आहे. पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश भाजप प्रभारीपदी नियुक्ती केली.  तसेच सुनील देवधर यांची आंध्रप्रदेशसह प्रभारीपदी नियुक्ती केली असून, विजया रहाटकर यांना दमन दीव-दादरा-नगर हवेली प्रभारीपदी नियुक्ती दिली. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना मणिपूरचे प्रभारी करण्यात आले आहे. त्याचबरोबर दुष्यंत कुमार गौतम यांना उत्तराखंड आणि पंजाबची जबाबदारी दिली आहे. भाजपने पुन्हा एकदा वरिष्ठ ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीयांवर विश्वास दाखवला असून, त्यांना पुन्हा पश्चिम बंगालची जबाबदारी सोपवली.अरुण सिंग यांना राजस्थानचा कार्यभार देण्यात आला आहे. बिहारमध्ये भाजपाने प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव आणि सह प्रभारी हरीश द्विवेगी आणि अनुपम हाजरा यांची नियुक्ती केली आहे. भाजपने पक्षाने 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सह प्रभारी नेमलेले नाहीत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.