राज ठाकरेंच्या वीजबिल माफी आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचे विधान

राज ठाकरेंचे मनापासून अभिनंदन! भाजपही त्यांच्यासोबत या आंदोलनात मोठी घोषणा

0

नागपूर : वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे  यांनी केली.भाजपने महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच बावनकुळे यांनी हे विधान केल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेत वेगळीच खिचडी शिजत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, असे विधान बावनकुळे यांनी केल्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची काल मुंबईत बैठक पार पडली. यावेळी भाजपने आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यानंतर लगेचच बावनकुळे यांनी मनसेच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निमित्ताने भाजप आणि मनसे महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का? अशी चर्चाही रंगत आहे. सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे 82 आणि शिवसेनेचे 84 नगरसेवक आहेत. येत्या पालिका निवडणुकीत शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी होण्याची शक्यता आहे. अशावेळी महापालिकेत सत्ता आणण्याच्या भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आता भाजपने मनसेला सोबत घेण्याची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. मनसे आणि भाजप एकत्र आल्यास आगामी महापौर भाजपचा आणि उपमहापौर मनसेचा होऊ शकतो, असा अंदाजही राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.

बावनकुळे काय म्हणाले? : महावितरण वीज कनेक्शन तोडणीसाठी आले तर भाजप आपला झेंडा घेऊन तिथे हजर राहणार. नितीन राऊत यांच्या पाठीशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही, त्यामुळे अधिकारी त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत. आजच्या आज साडेतीन हजार कोटी रुपये ऊर्जा विभागाला दिले तर सर्व प्रश्न सुटतील. १९५६ च्या नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले नाही. मुंबईत अधिवेशन होऊ शकते, नागपूरात होऊ शकत नाही?. या अधिवेशनात मोठ्या संख्येने मोर्चे येणार म्हणून अधिवेशन मुंबईत नेले. मुख्यमंत्री नागपूरला यायला घाबरतात, मग दिल्लीला काय जाणार?. विदर्भ वैधानिक महामंडळ बंद पाडण्याचे काम या सरकारने केले. मुख्यमंत्री, उपमुख्यनंत्र्यांची जबाबदारी काय?, ते कधी दिल्लीला गेले का? पंतप्रधानांना भेटले का? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा नागपूरच्या दौऱ्यावर.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.