‘महावितरण’ कडून सबस्टेशन सिडको वाळूज महानगर-१ येथे बिल दुरूस्ती शिबिर

शिबिराचे आयोजक शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे यांनी केले आवाहन

0

औरंगाबाद  : सिडको वाळूज महानगर-१ ‘कोरोना’वर  नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले होते. वाळूज महानगरात या लॉकडाऊन काळात महावितरणाने नागरिकांना वीजबिल पाठवले नव्हते. कारण  मीटररिंडींग घेणाऱ्या रिडरलादेखील या काळात मीटररिडिंग घेता आली नाही.

वाळूज महानगरात या लॉकडाऊन काळात महावितरणाने नागरिकांना वीजबिल पाठवले नव्हते. कारण  मीटररिंडींग घेणाऱ्या रिडरलादेखील या काळात मीटररिडिंग घेता आली नाही.त्यामुळे आता एकदम आलेल्या बिलात या सबस्टेशनअंतर्गत येणारे ग्राहकांना प्रत्यक्ष रिडिंगप्रमाणे बिल मिळाले नाही. तसेच ते एकदाच तीन महिन्यांचे बिल मिळाले असल्याने ग्राहकांना यामध्ये जास्त बिल आकारले, असे वाटते आहे. तसेच काहींना जास्त बिल प्राप्त झाले असल्यामुळे ते बिल भरणा करण्यास येत नाहीत. यावर  ता. 7 आँगस्ट 2020 रोजी सिडको वाळूज महानगर-१  सबस्टेशनअंतर्गत ग्राहकांना बिल दुरूस्ती करून घेण्यासाठी महावितरण कार्यालयाकडून सबस्टेशन सिडको वाळूज महानगर-१ येथे बिल दुरूस्ती कॅम्प आयोजित करण्यात आला. ज्या ग्राहकांना शंका अथवा काही चुकून बिल आले असल्यास ते दुरूस्ती करण्यासाठी बिलाची प्रत तसेच प्रत्यक्ष मीटररिडिंगचा फोटो घेऊन जास्तीत जास्त ग्राहकांनी  सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सबस्टेशन सिडको वाळूज महानगर-१ येथे उपस्थित राहुन बिल दुरूस्ती करून घ्यावे, असे अहवान कॅम्पचे आयोजक शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे यांनी केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.