बिहार काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता, पक्षाने बोलावली तातडीची बैठक

नितीश कुमार यांनी घोटाळा करून आमच्या काही जागा पाडल्या, तेजस्वी यादव यांचा आरोप

0

पाटणा : बिहारमध्ये महाआघाडीची  सत्ता थोडक्यात हुकली आहे. त्यामुळे देशातला सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचं तेजस्वी यादव यांचे स्वप्न भंगले. आता महाआघाडीत फुटीची शक्यता असून काँग्रेसला हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता महाआघाडीत फुटीची शक्यता असून काँग्रेसला हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी अजूनही आपल्याला सत्ता स्थापनेची आशा असल्याचा दावा केला आहे. सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक गुरूवारी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी बोलताना तेजस्वी यादव यांनी हे संकेत देत आमदारांची आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी पक्षाने तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर दिल्लीतूनही काही नेते पाटण्यात दाखल झाले असून ते आमदारांची चर्चा करत आहेत. महाआघाडीला 110 जागांवर समाधान मानावे लागले. त्यात राजदला सर्वाधिक 75 जागा, डाव्या पक्षांना 16 तर 70 जागा लढवून काँग्रेसला फक्त19 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर महाआघाडीचे सरकार आले असतं असेही म्हटले जात आहे. तर काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. पराभव स्वीकारून त्याची कारण शोधली पाहिजेत , असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या वाईट कामगिरीमुळेच बिहार महाआघाडीपासून वंचित राहिला, असे अन्वर यांनी म्हणाले. नितीश कुमार यांनी घोटाळा करून आमच्या काही जागा पाडल्या आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. आमदारांनी महिनाभर पाटणा सोडून जाऊ नये. सरकार आपणच बनविणार आहोत, असेही तेजस्वी यादव यांनी म्हणाले आहे. एनडीएमधल्या घटकपक्षांना सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही तर ते वेगळा निर्णय घेऊ शकतात, असे तेजस्वी यादव यांना वाटते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.