बिहार विधानसभा निवडणूक निकाल आज; मतमोजणी सुरू

अनेक दिग्गजांसह आज एकूण ३ हजार ७३४ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय

0

पाटणा : देशभरातील जनतेचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल आज (10 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सकाळी 8 वाजता सुरुवात होईल. तर सकाळी दहाच्या दरम्यान निकालाचा पहिला कल समोर येईल.

बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. यात 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला 243 जागांसाठी मतदान झाले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकाल आज आहे. अनेक दिग्गजांसह आज एकूण ३ हजार ७३४ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होत आहे.  आज ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारण ९ ते १० वाजल्यापासून निकालाचे कल हाती येणार आहेत. देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मतमोजणीबाबत अधीरता वाढत चालली आहे. पाटण्यातील अनुग्रह नारायण कॉलेज येथील मतमोजणी केंद्राच्या बाहेर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी उसळली. आज सकाळी ८ वाजता सुरू होईल मतमोजणी. नागरिकांना निकाल पाहता यावेत, यासाठी कंट्रोल यूनिटच्या माध्यमातून प्रदर्शित होणारे निकाल मोठ्या पडद्यावर पाहता यावेत, याकरिता निवडणूक आयोगाने कालच निर्देश दिले होते  मतमोजणी केंद्र राज्यातील जिल्हा मुख्यालयांमध्ये बनवण्यात आले आहेत. मतमोजणी पारदर्शक व्हावी, यासाठी मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात होईल.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.