बिहार विधानसभा निवडणूक निकालास उशीर लागण्याची शक्यता!

यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळं ईव्हीएम मशीनच्या संख्येतही वाढ

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांचा जेडीयू आणि भाजप यांची एनडीए आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि आरजेडी याची महाआघाडी पिछाडीवर पडल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालाला काहीसा उशीर लागण्याची शक्यता आहे.
कोरोना संकटामुळे आखून देण्यात आलेल्या नियमावलीमुळे बिहार निवडणुकीचा निकाल लागण्यास उशीर होऊ शकतो. अंतिम निकालास उशीर लागण्याची शक्यता का? कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणूक निकालासाठी 2 ते 3 तासांचा उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदानासाठी एकूण 1 लाख 6 हजार 526 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. जे मागील निवडणुकीच्या तुलनेत 63 टक्के अधिक होते. 2015 च्या निवडणुकीत 65 हजार 367 मतदान केंद्रे होती. यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळं ईव्हीएम मशीनच्या संख्येतही वाढ झाली. त्यामुळे निवडणूक निकालाच्या अंतिम घोषणेला उशीर लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार एखाद्या उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतला तर अशास्थितीत ईव्हीएम सील केले जाईल. त्यानंतर मतांच्या संख्येची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी करुन पाहण्यात येईल. असे झाल्यास अंतिम निकाल हाती येण्यास उशीर लागू शकतो मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाली आहे. नियमानुसार सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी सुरु करण्यात आली आहे. ईव्हीएमच्या एका राऊंडला 15 ते 20 मिनिटे लागतात. त्यामुळेही अंतिम निकाल येण्यास उशीर लागू शकतो.

आरजेडी नेते तेजप्रताप यादव पिछाडीवर

बिहार विधानसभा निवडणूक निकालात आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार RJDचे नेते आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. तेजप्रताप यादव समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तेजप्रताप यादव यांच्या विरोधात जनता दलाचे राजकुमार राय निवडणूक लढवत आहेत. राजकुमार राय यांनी तेजप्रताप यादव यांच्यावर 1400 मतांची आघाडी मिळवली आहे. तेजप्रताप यादव त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.