औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!

औरंगाबाद शहरातील हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला निर्णय

0

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरातील हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे. 17 तारखेपासून म्हणजे बुधवारपासून औरंगाबाद शहरातील हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. दरम्यान, हॉटेलमधील पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांत औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी जिल्हा प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता औरंगाबाद शहरातील सर्व हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे.

औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन

औरंगाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि एमआयडीसी वगळता सर्व बंद राहणार आहे. विशेष म्हणजे या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरात शेकडो पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

औरंगाबादमधील पर्यटनस्थळे बंद

त्याशिवाय गेल्या 11 मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचा संपूर्ण जगात एक पर्यटन शहर म्हणून नावलौकिक आहे. या ठिकाणी देशविदेशातून आलेले अनेक पर्यटक भेट द्यायचे. पण कोरोनामुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वेरुळ-अजिंठा लेणीसह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

औरंगाबादमध्ये काय बंद?

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था (कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) व इतर तत्सम संस्था बंद राहतील.
सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे, धरणे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध
आठवडी बाजार, जलतरण तलाव, क्रीडा स्पर्धा बंद राहतील.
सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्स पूर्णपणे बंद राहतील.
कोणत्याही सार्वजनिक विवाह समारंभास परवानगी असणार नाही.
औरंगाबाद शहरातील जाधवमंडी 11 मार्च ते 17 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहील.

औरंगाबादमध्ये काय सुरु?

1) वैद्यकीय सेवा दुकाने व बाजारपेठा, डी मार्ट, रिलायन्स, बिग बाजार, मोअर इ.
2) वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा मॉल्स, चित्रपटगृहे / नाट्यगृहे
3) दूध व्रिक्री व पुरवठा इ. हॉटेल, रेस्टॉरंट (प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलिव्ही व त्यासाठी स्वयंपाकगृहे/ किचन रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा राहील.)
4) भाजीपाला विक्री व पुरवठा सर्व खासगी कार्यालये/ आस्थापना
5) फळे विक्री व पुरवठा
6) जीवनावश्यक वस्तुंची दुकाने
7) पेट्रोल पंप, गॅस एजन्सी
8) सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खासगी व शासकीय), रिक्षासह इ.
9) बांधकामे
10) उद्योग व कारखाने
11) किराणा दुकाने (फक्त स्वरुपातील)
12) चिकन, मटन, अंडी व मांस व मच्छी दुकाने
13) वाहन दुरुस्ती दुकाने / वर्कशॉप
14) पशुखाद्य दुकाने
15) बँक व पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहील.
16) नोंदणीकृत पद्धतीने विवाहास परवानगी असेल.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.